Join us

पहिल्या विकेटआधी टेन्शन वाढवणारे दोन सीन; वरुण चक्रवर्तीनं दिला दिलासा! विल यंग जाळ्यात फसला

अन् हे दोन सीन पाहून स्टेडियमवर उपस्थितीत प्रेक्षकांसह टेलिव्हिजनवर सामना पाहणाऱ्यांचे टेन्शन वाढवलं. पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:34 IST

Open in App

दुबईच्या मैदानात रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनल लढतीत न्यूझीलंड संघ टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. विल यंग आणि रचिन रवींद्र जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. मोहम्मद शमीला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर रचिन रवींद्रचा कॅच घेऊन त्याला तंबूत धाडण्याची एक संधी निर्माण झाली होती. पण ती संधी हुकली. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवरही रचिनचा एक कॅच सुटला. अन् हे दोन सीन पाहून स्टेडियमवर उपस्थितीत प्रेक्षकांसह टेलिव्हिजनवर सामना पाहणाऱ्यांचे टेन्शन वाढवलं. पण वरुण चक्रवर्तीनं विल यंगला आपल्या जाळ्यात फसवलं अन् टीम इंडियासह तमाम चाहत्यांना थोडे टेन्शन फ्री केले. न्यूझीलंडच्या धावफलकावर ५७ धावा असताना विलय यंग पायचित झाला. त्याने २३ चेंडूत १५ धावा केल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एक नव्हे तर दोन कॅच सुटले अन् क्रिएटट झाला टेन्शन वाढवणारा सीन 

न्यूझीलंडच्या सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारीसह संघाला दमदार सुरुवात करून दिली.  संघाच्या धावफलकावर अर्धशतक लागण्याआधी न्यूझीलंडच्या डावातील सातव्या षटकात रचिन रवींद्रच्या कॅचची एक संधी निर्माण झाली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये टॅविस हेडचा जसा कॅच आला होता अगदी तसाच कॅच पुन्हा मोहम्मद शमीकडे आला. पण यावेळीही शमीला या संधीचं सोनं करता आले नाही. आठव्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. पहिला चेंडू वाइड टाकल्यावर रचिन रवींद्रनं मिड ऑनच्या दिशेनं मोठा फटका खेळला. अय्यर बॉलपर्यंत पोहचला पण इथंही कॅचची संधी हुकली. हे दोन सीन टीम इंडियासह चात्यांचे टेन्शन वाढवणारे होते. वरुण चक्रवर्तीनं सलामी जोडी फोडली अन् मग दिसला टेन्शन फ्री सीन 

न्यूझीलंडच्या डावातील आठव्या षटकात संघाला रचिनच्या रुपात एक जीवनदान मिळाले. पण याच षटकात वरुण चक्रवर्तीनं सलामीवीर विल यंगला आपल्या जाळ्यात अडकवले. स्टंपच्या आडवा येऊन फसला अन् पायचितच्या रुपात बाद होऊन त्याला तंबूत परतावे लागले. सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारी केल्यामुळे टीम इंडियाच टेन्शन वाढलं होते. पण वरुन चक्रवर्तीनं सलामी जोडी फोडून ताफ्यातील सर्वांसह भारतीय संघाला प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांना मोठा दिलासाच दिला.   

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वरूण चक्रवर्ती