Join us

चहलचा व्हिडिओ व्हायरल, ‘१० रुपये की पेप्सी, युजी भाई ...’

व्हिडीओमध्ये राजस्थान संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणारा दिशांत याज्ञिक हा चहलची मस्करी करताना दिसतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 05:52 IST

Open in App

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या पर्वाची राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा  ६१ धावांनी पराभव केला. या विजयात फिरकीपटू युजवेंद्र चहलचा महत्त्वाचा वाटा होता. विजयानंतर चहलचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ राजस्थानच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओमध्ये राजस्थान संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणारा दिशांत याज्ञिक हा चहलची मस्करी करताना दिसतो.

चहल ड्रेसिंग रुममधून बाहेर पडत असून तेवढ्यात दिशांत येऊन चहलकडे हात दाखवून एक घोषणा देतो. ‘१० रुपये की पेप्सी, युजी भाई सेक्सी’, असं दिशांत म्हणतो. खेळाबरोबरच हटके स्टाइल आणि सतत काही ना काही मजेदार गोष्टींमुळे चर्चेत राहणारा चहल याकडे फारसे लक्ष न देता हसत पुढे निघून जातो. सामन्याच्यावेळी ‘पुण्याच्या मैदानातील या घोषणा स्टॅण्डमधून थेट ड्रेसिंग रुमपर्यंत येऊन पोहचल्यात.’ 

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App