Join us
Daily Top 2Weekly Top 5

बळी घेताच चहलचा धनश्रीला फ्लाईंग किस

चहलने धनश्रीकडे इशारा करीत फ्लाईंग किस दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 05:07 IST

Open in App

मंगळवारी पुण्यात झालेल्या सामन्यात राजस्थानचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल याने प्रभावी कामगिरी केली. दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीत बसलेली त्याची पत्नी धनश्री लक्ष वेधून घेत होती.  चहलने राजस्थानसाठी पहिल्याच सामन्यात २२ धावात तीन बळी घेतले. या दरम्यान धनश्री पतीला चीअरअप करीत होती. चहलने पहिला बळी घेताच धनश्रीच्या आनंदाला उधाण आले. त्याचवेळी चहलने धनश्रीकडे इशारा करीत फ्लाईंग किस दिला. 

पंजाबी तडका, कॅरेबियन मस्ती!भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. तो नेहमी ट्रेंडिंग व्हिडिओ शेअर करतो. असाच एक मजेदार व्हिडिओ त्याने शेअर केला. त्यात तो पंजाब किंग्सच्या सहकाऱ्यांसोबत नृत्यावर ताल धरताना दिसत आहे.  पंजाबने आरसीबीला नमवून पहिला सामना जिंकला. विजयानंतर पंजाबचे खेळाडू मूडमध्ये होते. शिखरने सहकारी अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, कॅगिसो रबाडा आणि ओडीयन स्मिथ यांच्यासोबत नृत्य केले.  सोबत कॅप्शन लिहिले,‘ पंजाबी तडका आणि कॅरेबियन मस्ती, हॅशटॅग टीम बॉंडिंग...’ 

 

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App