Join us

साता समुद्रापार पोहोचलेला 'चहल टीव्ही' आता चंद्रावरही जाणार

साता समुद्रापार ऑस्ट्रेलियामध्येही 'चहल टीव्ही'ची धुम पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 19:27 IST

Open in App

नेपीयर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघामध्ये युजवेंद्र चहल हा एक चांगला फिरकीपटू आहे. पण त्याची ओळख फक्त एवढीच नाही. कारण एका सामन्यानंतर एखाद्या खेळाडूने दमदार कामगिरी केली असेल तर तो त्यांची मुलाखत घेतो. साता समुद्रापार ऑस्ट्रेलियामध्येही 'चहल टीव्ही'ची धुम पाहायला मिळाली. आता तर हा टीव्ही थेट चंद्रावर जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियातील सामना जिंकल्यावर 'चहल टीव्ही'मध्ये केदार जाधवची मुलाखत घेण्यात आली होती. केदार जाधवने त्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यामुळे सामन्यानंतर केदारची खास मुलाखत 'चहल टीव्ही'मध्ये घेण्यात आली होती. यावेळी केदारने जे वक्तव्य केले, ते या व्हिडीओमधून तुम्ही जाणून घ्या...

हा पाहा खास व्हिडीओ

टॅग्स :युजवेंद्र चहलकेदार जाधवभारत विरुद्ध न्यूझीलंड