Join us  

किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, आंद्रे रसेलसह विंडीजचे स्टार खेळाडू IPL 2021च्या उर्वरित सामन्यांना मुकणार!

कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआय आता सप्टेंबरच्या विंडोचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 4:31 PM

Open in App

इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी संघाचे खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्यात आता वेस्ट इंडिजचे खेळाडूही मुकण्याची शक्यता आहे. ख्रिस गेल, आंद्रे रसेल, निकोलस पूरन, सुनील नरीन, किरॉन पोलार्ड यांच्यासह वेस्ट इंडिजचे स्टार खेळाडू आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला मुकण्याची शक्यता आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगचा ( Caribbean Premier League ) च्या २०२१पर्वाच्या तारखा आज जाहीर केल्या गेल्या. २८ ऑगस्टला CPL 2021ला सुरुवात होईल आणि १९ सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआय आता सप्टेंबरच्या विंडोचा विचार करत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आयपीएलचे उर्वरित ३१ सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. हे सामने यूएई किंवा लंडन यापैकी एका देशात खेळवण्याचा विचार सुरू आहे. CPLचे ३३ सामने सेंट किट्स अँड नेव्हिस येथील वॉर्नर पार्कवर खेळवण्यात येतील. गतवर्षी ही लीग त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे खेळवण्यात आली होती आणि तिनं ५२३ मिलियन व्ह्यूअर्स  मिळवले होते. २०१९च्या तुलनेत ६७ टक्क्यांनी हा आकडा मोठा होता.  

बार्बाडोस ट्रायडंट - जेसन होल्डरगयाना अॅमेझॉन वॉरियर्स - शिमरोन हेटमायर, निकोलस पूरन, इम्रान ताहीर त्रिनबागो नाईट रायडर्स - किरॉन पोलार्ड, सुनील नरीन, 

 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगख्रिस गेलकिरॉन पोलार्डआयपीएल २०२१