Join us

कॅरेबियन खेळाडूंचे आर्थिक हित आयपीएलमध्येच-बिशप

ख्रिस गेल, डवेन ब्राव्हो, सुनील नरेन आणि कीरोन पोलार्ड यांनी देशाबाहेर टी-२० लीग खेळण्यास प्राधान्य दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:57 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलमध्येच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे आर्थिक हित असल्याचे मत माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप याने व्यक्त केले आहे.मागील काही वर्षांपासून विंडीज बोर्ड आणि खेळाडू यांच्यात वेतन आणि भत्ते यावरुन वाद होत आहेत. यामुळे ख्रिस गेल, डवेन ब्राव्हो, सुनील नरेन आणि कीरोन पोलार्ड यांनी देशाबाहेर टी-२० लीग खेळण्यास प्राधान्य दिले आहे. स्टार खेळाडूंचा समावेश नसल्याने विंडीजला वन डे तसेच कसोटी मालिकेत अनेकदा पराभवाचा सामना देखील करावा लागला.खेळाडूंना दिलेल्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करताना या वादाबाबत बिशपने बोर्डाला जबाबदार ठरवले.

टॅग्स :आयपीएल