KKR vs GT : "निकालाने निराश झालो पण...", हॅटट्रिक घेऊनही पराभव झाल्याने कर्णधार राशिद खान व्यथित

yash dayal : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:33 PM2023-04-09T20:33:38+5:302023-04-09T20:34:10+5:30

whatsapp join usJoin us
Captain Rashid Khan expresses his displeasure as Gujarat Titans lose after taking a hat-trick in IPL 2023, Rinku Singh hits 5 sixes in the last over to lead KKR to victory | KKR vs GT : "निकालाने निराश झालो पण...", हॅटट्रिक घेऊनही पराभव झाल्याने कर्णधार राशिद खान व्यथित

KKR vs GT : "निकालाने निराश झालो पण...", हॅटट्रिक घेऊनही पराभव झाल्याने कर्णधार राशिद खान व्यथित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rinku singh ipl 2023 । अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बाजी मारली. हार्दिकच्या (Hardik Pandya) अनुपस्थितीत गुजरातच्या संघाचे कर्णधारपद सांभाळत असलेल्या राशिद खानने हॅटट्रिक घेऊन सामन्यात रंगत आणली. राशिदच्या अखेरच्या षटकात सामन्याचा निकाल बदलला असे वाटत होते. पण अखेरच्या षटकांत रिंकू सिंगचे वादळ आले आणि गुजरातच्या गोलंदाजाला धुवून काढले. 


लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. अशातच रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून गुजरातला पराभवाची धूळ चारली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ धावा केल्या होत्या. 

दरम्यान, राशिद खानने आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करून हॅटट्रिक घेतली. पण रिंकू सिंगने राशिदची हॅटट्रिक व्यर्थ ठरवल्याने टायटन्सचा कर्णधार दुखावल्याचे पाहायला मिळाले. राशिदने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "खेळ आपल्याला नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो, आज त्याचेच उदाहरण पाहायला मिळाले. निकालाने मी निराश झालो पण पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करू." 

राशिद खानची हॅटट्रिक 

गुजरातकडून साई सुदर्शन (५३) आणि विजय शंकरने २४ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली. गुजरातने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची खराब सुरूवात झाली. सलामीवीर दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८० धावा करून विजयाकडे कूच केली. अशातच अल्झारी जोसेफने व्यंकटेश अय्यर (८०) आणि कर्णधार नितीश राणाला (४५) बाद करून यजमान संघाच्या चाहत्यांना जागे केले. त्यानंतर टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅटट्रिक घेऊन जवळपास विजय निश्चित केला.

अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट
अखेरच्या षटकांत केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने स्फोटक खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून केकेआरने सलग दुसरा विजय नोंदवला. रिंकूने ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली. अखेर केकेआरने २० षटकांत ७ बाद २०७ धावा करून गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Captain Rashid Khan expresses his displeasure as Gujarat Titans lose after taking a hat-trick in IPL 2023, Rinku Singh hits 5 sixes in the last over to lead KKR to victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.