'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 11:09 IST2018-11-14T11:08:07+5:302018-11-14T11:09:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
'Captain Cool' Mahendra Singh Dhoni's debut on Kabaddi field? | 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण?

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण?

ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहेऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याचा समावेश नाहीफावल्या वेळेत कॅप्टन कूल धोनीने कबड्डीवर हात आजमावले

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. एक महान क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेला माही उत्तम फुटबॉलपटूही आहे. इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी क्लबचा तो सहमालक आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसह त्याने हा क्लब विकत घेतला आहे. क्रिकेट आणि फुटबॉलनंतर कॅप्टन कूल धोनी कबड्डीच्या मैदानावरही पदार्पण करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या धोनीचे कबड्डी खेळतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे धोनी कबड्डीत पदार्पण करण्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, धोनी चाहत्यांना सांगू इच्छितो की, एका प्रमोशनल शूटसाठी धोनी कबड्डीच्या मैदानावर उतरला आहे.  



वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत धोनीचा भारतीय संघात समावेश नव्हता. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघातही धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. धोनी सध्या फॉर्मशी झगडत आहे आणि त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे. 
 

Web Title: 'Captain Cool' Mahendra Singh Dhoni's debut on Kabaddi field?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.