Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी मैदानाबाहेर जुळवणार 'रेशीमगाठी'

एका ऑनलाईन विवाहसंस्थेचा सदिच्छादूत म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 09:45 IST

Open in App

मुंबईः भारतीय संघाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंद धोनी विवाहोत्सुकांसाठी धावून आला आहे. एका ऑनलाईन विवाहसंस्थेचा सदिच्छादूत म्हणून धोनची निवड करण्यात आली असून तो मैदानाबाहेर रेशीमगाठी जुळवणार आहे. 

धोनी म्हणाला,''या ऑनलाईन विवाहसंस्थेशी नातं जोडल्याचा आनंद आहे. मागील 18 वर्षांत या संस्थेने अनेकांची लग्न जमवली आहेत. ऑनलाईन विवाहसंस्थेतील ही विश्वासाची संस्था आहे. या संस्थेसोबत काम करणार असल्याचा मला अभिमान आहे.'' 

भारतातीय अनेक युवकांचा प्रेरणास्थान असलेल्या धोनीची निवड केल्याचा आनंद या संस्थने व्यक्त केला. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना यष्टिरक्षक म्हणून संधी दिली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी