Join us

कॅप्टन कूल धोनी तणावमुक्त कसा राहतो माहिती आहे का...

एकामागून एक गोष्टी घडत असताना धोनी शांत कसा राहतो, हे गुपित आजपर्यंत कुणाला समजले नव्हते. पण दस्तुरखुद्द धोनीने ही गोष्ट आज सर्वांपुढे आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 20:26 IST

Open in App
ठळक मुद्देधोनीचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट झाला आणि धोनीच्या तणावमुक्तीचे गुपित उघड झाले.

नवी दिल्ली : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला आपण नेहमीच शांत असलेला पाहतो. मैदानात त्याला आक्रमक होताना, शिवीगाळ करताना पाहायला मिळत नाही. परिस्थिती कशीही असली तर तो कधीही भावनाविवश झालेला पाहायला मिळत नाही. एकामागून एक गोष्टी घडत असताना धोनी शांत कसा राहतो, हे गुपित आजपर्यंत कुणाला समजले नव्हते. पण दस्तुरखुद्द धोनीने ही गोष्ट आज सर्वांपुढे आणली आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. आजपासून भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु होणार आहे. पण धोनी कसोटी संघात नसल्याने तो मायदेशी परतला आहे. सध्याच्या घडीला तो आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ व्यतित करत आहे. हे सारे करत असताना त्याचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट झाला आणि धोनीच्या तणावमुक्तीचे गुपित उघड झाले.

ट्विटरवर धोनी रैना टीम असे एक ट्विटर हँडल आहे. यावर धोनीने आपल्या लाडक्या मुलीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्याने " झिवासोबत राहणे मला नेहमीच आवडते. कारण तिच्याबरोबर असतामा मी माझा तणाव विसरुन जातो, " असे लिहिले आहे.

धोनीचे ट्विट पाहा

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीक्रिकेटजीवा धोनी