Join us  

दहशतवादी हल्ला होणार नाही, याची हमी द्याल का?; बीसीसीआयचा पीसीबीवर पलटवार

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 5:22 PM

Open in App

2021चा ट्वेंटी-20 आणि 2023 चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळेल याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) लेखी हमी द्यावी अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी केली होती. त्याच्या या मागणीला बीसीसीआयनं सडेतोड उत्तर दिले आहे. तुम्ही दहशतवादी हल्ला न होण्याची हमी द्याल का? असा खोचल सवाल बीसीसीआयनं केला आहे.

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी एका  Cricket Baaz या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा मुद्दा मांडला. ते म्हणाले,''2021 आणि 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहेत. त्या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता आमच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी आम्ही आयसीसीला बीसीसीआयकडून लेखी हमी घेण्याची मागणी केली आहे. पण, सद्यस्थितीत 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होतो की भारतात हे पाहावे लागेल.''

त्यांच्या या मागणीवर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं IANSला सांगितले की,''आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांत कोणत्याही देशाच्या सरकारचा हस्तक्षेप नसावा, असा नियम आहे. तोच नियम क्रिकेट संघटनांनाही लागू होतो आणि ते सरकारच्या कामात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे आम्हाला व्हिसाची लेखी हमी मागणाऱ्या पीसीबीनं सीमेवर दहशतवादी कुरापत्या होणार नाही, याची लेखी हमी द्यावी.''

''सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबारी होणार नाही, दहशतवाद्यांना मदत मिळेल असं कृत्य होणार नाही, पुलवामाची पुनरावृत्ती होणार नाही, याची लेखी हमी पीसीबी देतील का?,'' हा सवाल बीसीसीआयनं विचारला.  

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा

IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!

Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!

पाच महिन्यांनंतर रोहित शर्मा मैदानावर सरावासाठी उतरला; म्हणाला...

 

टॅग्स :बीसीसीआयपाकिस्तान