Join us

‘तळाच्या फलंदाजांविरुद्ध अपेक्षित खेळ करु शकलो नाही’

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते, ‘कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांविरुद्ध भारतीय गोलंदाज रणनितीनुसार गोलंदाजी करु शकले नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:20 IST

Open in App

लंडन : भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते, ‘कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांविरुद्ध भारतीय गोलंदाज रणनितीनुसार गोलंदाजी करु शकले नाही.भारताला पाचव्या गोलंदाजी कमतरता जाणवली का यावर बोलताना बुमराह म्हणाला की हा प्रश्न व्यवस्थापनासाठी आहे. मला संघ निवडीबाबत माहिती नाही.’तो पुढे म्हणाला की, ‘जेव्हा अतिरिक्त गोलंदाज असतो तेव्हा गोलंदाजीत प्रयोग होऊ शकतात. चार गोलंदाज असल्याने तुम्हाला अधिक षटके टाकावी लागावी लागतात. एवढाच काय तो फरक पडतो. आम्ही आमच्याबाजुने सर्वोत्तम प्रयत्न केले. पण अतिरिक्त गोलंदाजामुळे आराम मिळतो.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ