Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन कारणांमुळे याच महिन्यात होऊ शकते विरूष्काचे लग्न

अभिनेत्री अनुष्का शर्मा सहकुटुंब इटलीला गेल्यामुळे पुन्हा एकदा विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:31 IST

Open in App
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने विरूष्काच्या लग्नाची तारीख जाहीर केल्यानंतर काहीवेळातच अनुष्काच्या पीआरने या वृत्ताचे खंडन केले होते. विराट आणि अनुष्का आपले प्रेमसंबंध विवाहामध्ये बदलण्याबाबत अत्यंत गंभीर आहेत.

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्मा सहकुटुंब इटलीला गेल्यामुळे पुन्हा एकदा विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रसारमाध्यमं सूत्रांच्या हवाल्याने लग्नाच्या वेगवेगळया तारखा जाहीर करत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने विरूष्काच्या लग्नाची तारीख जाहीर केल्यानंतर काहीवेळातच अनुष्काच्या पीआरने या वृत्ताचे खंडन केले होते. गुरुवारी रात्री अनुष्का सहकुटुंब इटलीला रवाना झाल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेने जोर पकडला आहे. विराट किंवा अनुष्काकडून जो पर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तो पर्यंत या बातम्यांना पूर्णविराम मिळणार नाही. 

या तीन कारणांमुळे विरूष्काची जोडी डिसेंबरमध्येच विवाहबद्ध होण्याची दाट शक्यता आहे. 

- विराट आणि अनुष्का आपले प्रेमसंबंध विवाहामध्ये बदलण्याबाबत अत्यंत गंभीर आहेत. विराटचे जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने इटलीचे हवाई तिकिट बुक केले आहे असे वृत्त  इंडियाने टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. इटलीतील मिलान शहरात दोघांचे लग्न होईल असे बोलले जाते.  

- दिल्लीच्या अंडर 23 संघाचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा सध्या सुट्टीवर आहेत. दिल्लीचा महत्वाचा सामना सुरु असतानाही त्यांनी खास लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. राजकुमार शर्मा विराटचे प्रशिक्षक आहेत. शालेय जीवनात विराटने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली फलंदाजीचे धडे गिरवले. भाच्याच्या लग्नासाठी आपण सुट्टी घेतोय असे राजकुमार शर्मा यांनी सांगितले आहे. विराटच्या आयुष्यात राजकुमार शर्मा यांचे एक वेगळे स्थान आहे.  

- मागच्याच आठवयात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीला अनुष्काच्या घरातून बाहेर पडताना पाहण्यात आले होते. सब्यासाची अनुष्कासाठी खास विवाहाचे कपडे डिझाइन करत असल्याची तेव्हापासून चर्चा आहे. 

टॅग्स :विराट कोहली लग्नअनुष्का शर्मा