Join us  

IPL लिलावात पॅट कमिन्स मालामाल अन् गर्लफ्रेंडनं सांगितले खर्चाचे भन्नाट प्लान्स

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला मालामाल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 12:40 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला मालामाल केले. कोलकाता नाइट रायडर्सनं त्याच्यासाठी 15.50 कोटी रक्कम मोजली. आयपीएलच्या इतिहासातील कमिन्स हा युवराज सिंग ( 16 कोटी) याच्यानंतर दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएल लिलावात 62 खेळाडूंवर बोली लागली. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली. पण, त्यात सर्वाधिक रक्कम ही कमिन्ससाठी मोजण्यात आली. कमिन्सला लागलेल्या लॉटरीनंतर त्याच्या गर्लफ्रेंडनं खर्चाचे भन्नाट प्लान्सही आखले.

आयपीएलच्या लिलावात ही दुसरी सर्वोत्तम बोली ठरली. यात युवराज सिंग 16 कोटींसह ( दिल्ली कॅपिटल्स 2015) अव्वल स्थानावर आहे. या यादीत बेन स्टोक्स ( 14.50 कोटी), युवराज ( 14 कोटी), दिनेश कार्तिक ( 12.50 कोटी), बेन स्टोक्स ( 12.50 कोटी) आणि टायमल मिल्स ( 12 कोटी) यांचा क्रमांक येतो. कमिन्ससह ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटींत किंग्ज इलेव्हन पंजाबनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. दुसरीकडे नॅथन कोल्टर नीलसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस रंगली, परंतु रोहित शर्माच्या संघानं 8 कोटी किंमत मोजून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( 4.4 कोटी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे. 

या पैशांचं काय करणार, असे विचारल्यानंतर कमिन्स म्हणाला,''इतक्या पैशांचं काय करायचं, हे मलाच माहीत नाही. 15.50 कोटीची यशस्वी बोली लागल्यानंतर गर्लफ्रेंडनं पहिली मागणी केली ती घरातल्या पाळीव कुत्र्यासाठी भरपूर टॉय विकत घेण्याची. तिनं तिचं प्राधान्यक्रम ठरवला आहे. पण, इतकी रक्कम मिळवल्यानंतरही मी आहे तसाच राहणार आहे. नशीबानं मला चांगल्या लोकांची संगत लाभली आहे.'' 

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020आॅस्ट्रेलियाकोलकाता नाईट रायडर्स