Jasprit Bumrah: नॉकआउट सामन्यात बुमराहचा कहर, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला, शमीचाही वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात!

Jasprit Bumrah Breaks Sachin Tendulkar Record: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत धुमाकूळ घालणारा भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडित काढला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:52 IST2026-03-10T12:51:46+5:302026-03-10T12:52:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Bumrah's havoc in the knockout match, Sachin Tendulkar's record broken, Shami's world record also in danger! | Jasprit Bumrah: नॉकआउट सामन्यात बुमराहचा कहर, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला, शमीचाही वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात!

Jasprit Bumrah: नॉकआउट सामन्यात बुमराहचा कहर, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला, शमीचाही वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात!

२०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. बुमराहने केवळ भारताला विजय मिळवून दिला नाही, तर क्रिकेटचे दैवत मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रमही मोडीत काढला. 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात बुमराहने आपल्या गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेऊन कीवी संघाचे कंबरडे मोडले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावी म्हणून गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, २०२४ च्या विश्वचषकातही त्याला 'मालिकावीर' म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 

बुमराहने या सामन्यात घेतलेल्या ४ विकेट्समुळे त्याने आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. बुमराहने आता १६ विकेट्ससह आर. अश्विनची बरोबरी केली असून सचिन तेंडुलकर (१५ विकेट्स) याला मागे सोडले आहे.

आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स:

१)मोहम्मद शमी - २२
२)  झहीर खान - १७
३) जसप्रीत बुमराह - १६
४) रविचंद्रन अश्विन - १६
५) सचिन तेंडुलकर - १५
६) रवींद्र जडेजा - १५

आता शमीचा विक्रम निशाण्यावर

सध्या ३२ वर्षांचा असलेला जसप्रीत बुमराह आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ज्या प्रकारे तो सध्या फॉर्मात आहे, ते पाहता आगामी आयसीसी स्पर्धांमध्ये तो मोहम्मद शमीचा २२ विकेट्सचा विक्रमही लवकरच मोडीत काढण्याची शक्यता आहे. जर बुमराहने हे यश मिळवले, तर तो आयसीसी बाद फेरीतील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल.

Web Title : नॉकआउट मुकाबले में बुमराह का कहर, सचिन का रिकॉर्ड तोड़ा, शमी का रिकॉर्ड खतरे में!

Web Summary : जसप्रीत बुमराह के शानदार प्रदर्शन से भारत ने न्यूजीलैंड के खिलाफ टी20 विश्व कप फाइनल जीता। उन्होंने आईसीसी नॉकआउट विकेट में सचिन तेंदुलकर को पछाड़ा और अब मोहम्मद शमी का रिकॉर्ड तोड़ने के करीब हैं। उनके शानदार प्रदर्शन ने उन्हें 'मैन ऑफ द मैच' दिलाया।

Web Title : Boomrah's knockout brilliance, breaks Tendulkar's record, Shami's record in danger!

Web Summary : Jasprit Bumrah's stellar performance led India to victory in the T20 World Cup final against New Zealand. He surpassed Sachin Tendulkar in ICC knockout wickets and is now close to breaking Mohammed Shami's record. His match-winning spell earned him the 'Man of the Match' award.