Join us

बुमराहने सहा वेगवेगळ्या स्टाईलने टाकले चेंडू

दुबई : मुंबई इंडियन्सचा सराव सुरू असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चक्क सहा चेंडू वेगवेगळ्या गोलंदाजांच्या स्टाईलमध्ये टाकले. हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:41 IST

Open in App

दुबई : मुंबई इंडियन्सचा सराव सुरू असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चक्क सहा चेंडू वेगवेगळ्या गोलंदाजांच्या स्टाईलमध्ये टाकले. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या टिष्ट्वटरवर पोस्ट केला .

मुंबई इंडियन्स संघ सरावात मग्न आहे. सराव सुरू असताना बुमराने एक भन्नाट षटक टाकले. या षटकामधील सहाच्या सहा चेंडू वेगवेगळ्या स्टाईलमध्ये टाकले आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या टिष्ट्वटर हँडलवर बुमराहचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधील सहा गोलंदाजांना तुम्ही ओळखता का, असा सवालही मुंबई इंडियन्सने चाहत्यांना केला आहे.

मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ साली आयपीएलची चार जेतेपदे पटकावली आहेत. गेल्यावर्षी अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले होते.

टॅग्स :जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्स