भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ‘होम क्वारंटाईन’

स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त सचिवपदी कार्यरत आहेत. सौरव यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गांगुली यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन करून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 00:42 IST2020-07-17T00:38:22+5:302020-07-17T00:42:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Brother Corona Positive, BCCI President Sourav Ganguly 'Home Quarantine' | भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ‘होम क्वारंटाईन’

भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ‘होम क्वारंटाईन’

कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे मोठे बंधू स्नेहाशिष गांगुली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौरव गांगुली यांनीही बुधवारपासून स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.
स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त सचिवपदी कार्यरत आहेत. सौरव यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गांगुली यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन करून घेतले. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभिषेक दालमिया हेदेखील घरीच क्वारंटाईन झाले.
स्नेहाशिष हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी काही काळ बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्नेहाशिष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले काही दिवस स्नेहाशिष यांना ताप येत होता आणि तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली.

Web Title: Brother Corona Positive, BCCI President Sourav Ganguly 'Home Quarantine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.