Join us  

इस्लाम स्वीकारलं म्हणून फलंदाजीत सुधारणा झाली, भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले; पाकिस्तानी खेळाडूचं विधान 

पाकिस्तानी संघाचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ ( Mohammad Yusuf) यानं २००६ सालच्या अविश्वसनीय कामगिरीचं श्रेय इस्लामला दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:44 AM

Open in App

पाकिस्तानी संघाचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ ( Mohammad Yusuf) यानं २००६ सालच्या अविश्वसनीय कामगिरीचं श्रेय इस्लामला दिलं. इस्लामचा स्वीकार केल्यामुळे खेळात प्रचंड सुधारणा झाली, असे युसूफ म्हणाला. याची सुरुवात भारताविरुद्धच्या १७३ धावांच्या खेळीनं झाली. त्यानंतर युसूफनं इंग्लंड दौरा गाजवला. त्यानं एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या सर व्ही व्ही एन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. त्यानं २००६च्या कॅलेंडर वर्षात १७८८ धावा चोपल्या. विज्डनला दिलेल्या एका मुलाखतीत युसूफनं हे कबुल केलं की त्याच्या आयुष्यावर सइद अन्वरचा प्रभाव होता. मुलीच्या मृत्यूनंतर सइद धर्माच्या दिशेनं झुकत होता आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेले बदल युसूफनं पाहिले होते. त्यामुळेच त्यानेही इस्लामचा स्वीकार केला. पृथ्वी शॉ फॉर्मात; ७९ चेंडूंत शतक, १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी, विराट कोहलीशी बरोबरी

युसूफनं इस्लामचा स्वीकार करण्याबद्दल PakPassion.net ला सांगितले की,''इस्लामचा स्वीकार करण्यासाठी माझ्यावर कुणीच जबरदस्ती केली नाही. अनेकांनी तसे आरोप केले होते. पण, सइन अन्वरच्या आयुष्यात झालेल्या बदलांमुळे मला तसे करावेसे वाटले. तो माझा चांगला मित्र होता आणि त्याचे आई-वडील मला मुलगाच मानायचे. त्याच्या घरी गेल्यावर शांती असायची. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली. मीही इस्लामचा स्वीकार केला अन् आयुष्यात अनेक चांगले बदल झाले.''  Video : विचित्र पद्धतीनं बाद झाला श्रीलंकेचा फलंदाज; वेस्ट इंडिजचा संघ अन् कारयन पोलार्ड आरोपीच्या पिंजऱ्यात

२००६ सालच्या कामगिरीला उजाळा देताना युसूफ म्हणाला,''२००५मध्ये मी इस्लामचा स्वीकार केला. दाढी वाढवली आणि त्यानंतर आधीपेक्षा अधिक शांती मनाला मिळू लागली. २००६मधील चांगली कामगिरी हे अल्लाहनं मला दिलेली भेट होती. इस्लाम स्वीकारल्यानंतर मन शांत वाटू लागले अन् मानसिक स्थैर्य प्राप्त झाले, त्यामुळेच अनेक विक्रम मोडू शकलो. व्ही व्ही एन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडू शकेल हा विचारही मी कधी केला नव्हता.'' IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत  

मोहम्मद युसूफचं पहिलं नाव युसूफ योहाना होतं. त्यानं पाकिस्तानकडून ९० कसोटीत ७५३० धावा केल्या आणि त्यात २४ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश होता. २८८ वन डे सामन्यांत त्यानं १५ शतकं व  ६४ अर्धशतकांसह ९७२० धावा केल्या आहेत.  रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं! 

टॅग्स :पाकिस्तानभारत