वेस्टइंडीज संघ २७ धावांवर ऑलआऊट झाला, त्याला भारत कारणीभूत! लाराच्या वक्तव्याने वेधले लक्ष!

west indies 27 all out: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा संघ अवघ्या २७ धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर त्यांच्यावर नामुष्की ओढावली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:50 IST2025-07-17T12:49:51+5:302025-07-17T12:50:51+5:30

whatsapp join usJoin us
Brian Lara veiled IPL swipe after West Indies 27 all out; David Lloyd blames India: They take all the money | वेस्टइंडीज संघ २७ धावांवर ऑलआऊट झाला, त्याला भारत कारणीभूत! लाराच्या वक्तव्याने वेधले लक्ष!

वेस्टइंडीज संघ २७ धावांवर ऑलआऊट झाला, त्याला भारत कारणीभूत! लाराच्या वक्तव्याने वेधले लक्ष!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा संघ अवघ्या २७ धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर त्यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा संघ एवढ्या कमी धावांवर ऑलआऊट झाला आहे. वेस्ट इंडीजच संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने वेस्ट इंडीजच्या खराब कामगिरीचे खापर बीसीसीआयवर फोडले आहे. आयपीएलसारख्या लीगमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे. 

वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सबीना पार्क डे- नाईट कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ ८७ चेंडूत अवघ्या २७ धावांवर ऑलआऊट झाला. एवढेच नव्हेतर तीन सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला ३-० ने हरवले. यानंतर क्रिकेटविश्वात वेस्ट इंडीजच्या लाजिरवाण्या कामगिरीची चर्चा रंगली. याच पार्श्वभूमीवर ब्रायन लारा यांनी स्टिक टू क्रिकेट पॉडकॉस्टमध्ये वेस्ट इंडीजच्या निराशजनक कामगिरीसाठी आयपीएल आणि टी-२० लीगला जबाबदार धरले.

"वेस्ट इंडीजच्या संघात संधी मिळवण्यासाठी अनेक खेळाडू फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतात. तर, काही जण काउंटी क्रिकेट खेळतात. अनेक खेळाडू कुठेतरी करार मिळविण्यासाठी वेस्टर्न ईस्ट संघाचा वापर एक पायरी म्हणून करत आहोत आणि त्यात खेळाडूची चूक नाही", असे ब्रायन लारा म्हणाले.

Web Title: Brian Lara veiled IPL swipe after West Indies 27 all out; David Lloyd blames India: They take all the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.