Join us  

Breaking : न्यूझीलंडच्या गोलंदाजामध्ये कोरोनाची लक्षणं?; पुढील 24 तास देखरेखीखाली

ऑस्ट्रेलियन गोलंदाज केन रिचर्डसन याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वैद्यकीय उपचारासाठी माघार घ्यावी लागली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 9:04 PM

Open in App

भारत- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका- इंग्लंड या मालिका कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वन डे मालिकाही संकटात येण्याची शक्यता आहे. आज या मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाज केन रिचर्डसन याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वैद्यकीय उपचारासाठी माघार घ्यावी लागली होती. मात्र तपासणी अहवालात केन रिचर्डसचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले. त्यातच आता अजून एका खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहे.

 ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या पहिल्या वन- डे सामन्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन यालाही घशाचा त्रास होत असल्याचे समोर आले. आज झालेल्या सामन्यात त्याने दोन विकेटही घेतल्या. आता त्याचीही कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे पुढील २४ तासांसाठी त्याला वगळे ठेवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानं काल रात्रीच संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घशाला त्रास होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा COVID-19च्या तपासणीसाठी नमुना घेण्यात आला होता. मात्र या तपासणीच्या अहवालात रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर केन रिचर्डसचा पुन्हा संघात रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील दूसरा सामना 15 मार्चला लखनऊ आणि तिसरा वन डे सामना 18 मार्चला कोलकाता येथे रंगणार होता.  तसेच हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसचा प्रदूर्भाव पाहता आज मालिकेतील दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.

टॅग्स :न्यूझीलंडआॅस्ट्रेलियाकोरोना