Join us  

Breaking : ZIM vs IND : KL Rahul चा फिटनेस रिपोर्ट समोर आला अन् BCCI ने शिखर धवनला कर्णधारपदावरून हटवला

Zimbabwe vs India Series : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 9:40 PM

Open in App

Zimbabwe vs India Series : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. या मालिकेसाठी BCCI ने जाहीर केलेल्या आधीच्या संघात कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) सोपवण्यात आली होती. लोकेश राहुल ( KL Rahul) याची निवड ही त्याच्या फिटनेस टेस्टवर अवलंबून होती आणि आज त्याचा अहवाल समोर आला. BCCI ने लोकेश राहुलच्या फिटनेसबाबत अपडेट्स देताना धवनला कर्णधारपदावरून हटवल्याचीही घोषणा केली आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

18 ऑगस्टपासून भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. मागील बराच काळ फिटनेसच्या व कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने क्रिकेटपासून दूर असलेल्या लोकेश राहुलचा समावेश या मालिकेसाठी करण्यात आला होता. पण, त्याच्या फिटनेस टेस्टवर या दौऱ्यावर तो जाईल की नाही हे अवलंबून होतं. अखेर आज त्याचा फिटनेस रिपोर्ट आला अन् तो खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे BCCI ने जाहीर केले.

मात्र त्याच वेळी कर्णधारपदाची जबाबदारी ही धवनकडून काढून घेऊन लोकेशकडे सोपवण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला. याआधी विंडीजमध्ये झालेल्या वन डे मालिकेत धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला होता आणि मालिकाही जिंकली होती. पण, आता लोकेश तंदुरुस्त झाल्याने रोहितच्या अऩुपस्थितीत उप कर्णधार म्हणून नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली गेली आहे.

भारतीय संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शिखर धवन ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर ( India’s squad for 3 ODIs: KL Rahul (Captain) Shikhar Dhawan (vice-captain), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Rahul Tripathi, Ishan Kishan (wicket-keeper), Sanju Samson (wicket-keeper), Washington Sundar, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Deepak Chahar. ) 

टॅग्स :लोकेश राहुलशिखर धवनभारतझिम्बाब्वेबीसीसीआय
Open in App