Join us  

Breaking : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिकसह तिघांचे पुनरागमन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 3:12 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलेली नाही. या मालिकेतून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन टीम इंडियात पुनरागमन करत आहेत. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आलेली आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांना संधी मिळाली आहे.

दुखापतीतून सावरताना पांड्याने स्थानिक ट्वेंटी-२० मालिकेत दोन वादळी शतकांसह ३४७ धावा कुटल्या. हार्दिकचे न्यूझीलंड दौऱ्यातून पुनरागमन अपेक्षित होते, परंतु तो स्वतः त्याच्या तंदुरुस्तीवर समाधानी नव्हता. म्हणून त्याने माघार घेतली. आता ट्वेंटी-२० स्पर्धेतून त्याने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. त्यामुळे त्याचे कमबॅक हे निश्चित मानले जात होते. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना स्थानिक ट्वेटी-20 सामन्यांत साजेशी कामगिरी करता आली नसली तरी त्यांना संधी देण्यात आलेली आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. 

दरम्यान,  मालिकेसाठी आफ्रिकेनं जाहीर केलेल्या संघातून फॅफ ड्यू प्लेसिस आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन पुनरागमन करणार आहेत. त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ खेळणार आहे.  या मालिकेत कायले व्हेरेयने, केशव महाराज आणि लुथो सिपाम्ला यांना कायम ठेवले आहे. डावखुरा फिरकीपटू जॉर्ज लिंडे याला वन डे संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 

भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुबमन गिल

दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक ( कर्णधार), टेंबा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, फॅफ ड्यू प्लेसिस, कायले व्हेरेयने, हेनरीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपाम्ला, बेयूरन हेंड्रीक्स, अॅनरीच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज

वन डे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 12 मार्च, धर्मशालाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 15 मार्च, लखनौभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 18 मार्च, कोलकाता 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहार्दिक पांड्याभुवनेश्वर कुमारशिखर धवन