Join us

Breaking : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; India-Pakistan एकाच गटात, १ जूनपासून स्पर्धा सुरू

T20 World Cup 2024 schedule  (Marathi News) : जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये खेळवला जाणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:08 IST

Open in App

T20 World Cup 2024 schedule  (Marathi News) : जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे.  या स्पर्धेसाठी सर्व २० संघ पात्र ठरले आहेत आणि आज स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आळे आहे. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातली लढत केव्हा व कुठे आहे, याची सर्वांना उत्सुकता होती आणि आज तारीख व ठिकाणही समोर आले आहे. १ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होईल. 

भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यात ९ जून २०२४ मध्ये न्यू यॉर्क येथे हाय व्होल्टेज सामना होणार आहे. आतापर्यंत उभय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये ७ वेळा भिडले आणि त्यात पाकिस्तानने १ विजय मिळवला आहे. २०२२च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ही पराभवाची मालिका खंडित केली होती. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये ५५ सामने होणार आहेत.

पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 

 

गटवारी अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

स्पर्धेचा फॉरमॅट...- २० संघ- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी - चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र- सुपर ८मध्ये  ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी - दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत- फायनल

भारतीय संघाचे वेळापत्रक

५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखासलामीचा सामना - १ जून - अमेरिका विरुद्ध कॅनडासाखळी फेरीचे सामने - १ ते १८ जूनसुपर ८ फेरीचे सामने - १९ ते २४ जूनपहिली सेमी फायनल - २६ जून, गयानादुसरी सेमी फायनल - २७ जून, त्रिनिदादफायनल - २९ जून, बार्बाडोस 

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तान