T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अनेक संघात बदल होताना दिसत आहेत. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद अन् प्रशिक्षक बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला संचालक म्हणून नेमण्यात येण्याची चर्चा आहे. रोहित शर्माकडून ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद काढून ती जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात येणार आहे. रोहितलाही याची कल्पना दिली आहे. आरोन फिंच यानेही ऑस्ट्रेलियाच्या अपयशानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यात दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिज संघाला ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या राऊंडमध्येच गाशा गुंडाळावा लागला. या पराभवाची जबाबदारी घेताना विंडीजचा कर्णधार निकोलस पूरन ( Nicholas Pooran) याने ट्वेंटी-२०सह वन डे संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
काव्या मारनने SRH मधून दिला डच्चू अन् कर्णधाराचे कामगिरीतून उत्तर; ८ Six, ५ Four सह झळकावले शतक, Video
क्रिकेट वेस्ट इंडिजनेही ( CWI) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुरन म्हणाला,“ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशेनंतर मी कर्णधारपदाचा खूप विचार केला. मी अतिशय अभिमानाने आणि समर्पणाने भूमिका स्वीकारली आणि गेल्या वर्षभरात त्यासाठी सर्व काही दिले. वर्ल्ड कप ही अशी स्पर्धा आहे, त्याबाबत सांगू शकत नाही आणि पुढील वाटचालीत माझे योगदान नक्की असेल. आम्ही संघ म्हणून पुन्हा एकत्र येईपर्यंत अनेक महिने लागतील. त्यामुळे मला CWI ला मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यापुढील सामन्यांच्या तयारीसाठी भरपूर वेळ द्यायचा आहे.”
![]()
तो म्हणाला, “ मी माघार घेत नाही. मी महत्वाकांक्षी आहे आणि वेस्ट इंडिज क्रिकेटचे कर्णधारपद मिळाले, हे माझे भाग्य समजतो. मी वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, यात काही शंका नाही. संघातील एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मी अन्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. एक खेळाडू म्हणून मी संघाला काय देऊ शकतो यावर मला लक्ष केंद्रित करायचे आहे.''
किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितीत पूरनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व सांभाळले होते आणि मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यानंतर पोलार्डने जेव्हा निवृत्तीचा निर्णय घेतला, तेव्हा पूरनची कर्णधारपदी अधिकृत निवड केली गेली. पूरनने १७ वन डे व २३ ट्वेंटी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व सांभाळले. त्याने नेदरलँड्सविरुद्द ( ३-०) व बांगलादेशविरुद्ध ( २-०) मालिका जिंकली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"