Yuvraj Singh's Retirement: 2011च्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो युवराज सिंगची निवृत्ती 

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग निवृत्ती घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:53 IST2019-06-10T13:46:51+5:302019-06-10T13:53:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BREAKING NEWS: Yuvraj Singh Announced Retirement From International And First-Class Cricke | Yuvraj Singh's Retirement: 2011च्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो युवराज सिंगची निवृत्ती 

Yuvraj Singh's Retirement: 2011च्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो युवराज सिंगची निवृत्ती 

मुंबई : भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग निवृत्ती घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यानं ही घोषणा केली.  त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता... 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. 





 

गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली होती. 

युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.

Web Title: BREAKING NEWS: Yuvraj Singh Announced Retirement From International And First-Class Cricke