Join us  

भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार 

२२ मार्चला आयपीएल २०२४ सुरू होत आहे आणि २३ मार्चला कोलकाताचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 9:46 AM

Open in App

मुंबई : श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) याची वाईट भीती खरी होताना दिसत आहे. वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी फायनलमध्ये दुसऱ्या डावात ९५ धावांची खेळी करताना भारतीय फलंदाजाच्या पाठीच्या दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढलं होतं.  ज्यासाठी मुंबईकच्या फलंदाजाने गेल्या वर्षी शस्त्रक्रिया करून घेतली होती. आता IPL 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याचा सहभाग धोक्यात येण्याचा अंदाज आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व त्याच्याकडे आहे. आयपीएलसाठी फक्त ९ दिवस शिल्लक असताना श्रेयसच्या दुखापतीनं KKR ची चिंता वाढवली आहे. २२ मार्चला आयपीएल २०२४ सुरू होत आहे आणि २३ मार्चला कोलकाताचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.

रणजी करंडक फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध खेळताना श्रेयसने मंगळवारी १११ चेंडूंच्या खेळीदरम्यान पाठीच्या दुखण्यावर दोनदा मुंबईच्या फिजिओकडून उपचार घेतले होते. बुधवारी तो दिवसभर मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता आणि TOIने दिलेल्या वृत्तानुसार  त्याच्या पाठीच्या स्कॅनसाठी रुग्णालयात गेले होते. “त्याच्या पाठीचे दुखणे चांगले दिसत नाही आहे. पाठीची तीच दुखापत वाढली आहे. रणजी ट्रॉफी फायनलच्या पाचव्या दिवशी तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. त्याला आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळता येणार नाही, असा धोका आहे,” असे एका सूत्राने TOI ला सांगितले .

अय्यरने या मोसमातील मुंबईचे दोन रणजी सामने गमावले होते. “घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान, त्याने भारतीय संघ व्यवस्थापनाला या दुखापतीबद्दल पुन्हा सांगितले होते,”असे सूत्राने सांगितले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय संघाचे प्रमुख नितीन पटेल यांनी त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर, तो रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत व फायनलमध्ये खेळला.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यररणजी करंडक