Join us  

ब्रेकिंग न्यूज! गांगुलीनंतर आता सचिन तेंडुलकरही बीसीसीआयमध्ये प्रवेश करणार

सचिन तेंडुलकरही बीसीसीआयमध्ये एंट्री करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 2:42 PM

Open in App

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. गांगुलीपाठोपाठ आता भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरहीबीसीसीआयमध्ये एंट्री करणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुली यांनी माजी कर्णधार राहुल द्रविडची भेट घेतली होती. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सचिनवर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

युवा खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे भवितव्य उज्वल होऊ शकते. एक चांगला माणूस म्हणूनही हा खेळाडू समाजात राहू शकतो. त्यामुळे या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सचिनची नियुक्ती करण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. याबाबतचे वृत्त जागरण या वृत्तसंस्थेने दिले आहे.

याबाबत सूत्रांनी सांगितले की, " याबाबतची प्रक्रीया सुरु झाली आहे. पण ही गोष्ट नेमकी प्रत्यक्षात कशी आणणार आणि त्यानंतर या गोष्टीचे काय परीणाम होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. पण त्यासाठी काही काळ जावा लागेल. रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शुभमन गिलसारख्या खेळाडूंबरोबर सचिन आपला वेळ व्यतित करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. सचिनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 24 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे सचिनपेक्षा चांगली व्यक्ती या गोष्टीसाठी भेटू शकत नाही, असे म्हटले जात आहे."

सौरव गांगुली आता रवी शास्त्रींना लावणार कामाला; देणार 'ही' अतिरीक्त जबाबदारीमुंबई : आतापर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे फक्त संघाबरोबरच असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता त्यांना चागलंच कामाला लावलं जाणार आहे. कारण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शास्त्री यांनी अतिरीक्त जबाबदारी देण्याचे सुतोवाच केले आहे.

आतापर्यंत फक्त भारतीय संघाबरोबर शास्त्री होते. भारतीय संघाचा सराव शास्त्री करून घेताता. त्याचबरोबर संघ व्यवस्थापनामध्येही त्यांचा सहभाग असतो. संघाची निवड, रणनीती आखणेस हे कामही शास्त्री करतात. पण आता त्यांना या व्यतिरीक्त नवीन काम करावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये जसे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे, तसेच गांगुलीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला बनवायचे आहे. त्यासाठी एक जागाही त्यांनी पाहिली आहे. अकादमीचे संचालकपद सध्या भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे आहे. पण रवी शास्त्री यांनीही या अकादमीमध्ये यावे आणि मार्गदर्शन करावे, असे गांगुलीला वाटत आहे.

याबाबत गांगुली म्हणाला की, " राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद द्रविडकडे आहे. या अकादमीमध्ये पारस म्हाम्ब्रेदेखील आहे. त्याचबरोबर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही येथे येतात. पण शास्त्री येत नाहीत. पण आता त्यांना येथे येऊन मार्गदर्शन करावे लागेल."

टॅग्स :सौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरबीसीसीआय