Join us

Breaking News : पृथ्वी शॉ याला भारताच्या संघात स्थान, धवनऐवजी मिळाली संधी

एकदिवसीय संघात धवनच्याजागी पृथ्वीला संघात स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:54 IST

Open in App

मुंबई : न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठीच्या एकदिवसीय संघात मुंबईकर पृथ्वी शॉ याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या दौऱ्यापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दुखापतग्रस्त झाला होता आणि तो या दौऱ्याला जाणार नाही हे निश्चित समजले गेले होते. पण आता धवनच्याजागी पृथ्वीला संघात स्थान देण्यात आले आहे.

 

धवन हा न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० लढतींमध्येही खेळणार नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० संघात धवनच्या जागी संजू सॅमसनला स्थान देण्यात आले आहे.

घरच्या मैदानावर श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांना पराभवाची चव चाखवल्यानंतर टीम इंडिया 2020 मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारतीय संघानं नववर्षातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेवर 2-0 असा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळपट्टींवर वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया आणखी तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. पण, या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवननं खांद्याच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली होती. त्यात तिसऱ्या सामन्यात अधिक भर पडली आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे धवनच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही साशंकता होती. अखेर धवनला किवी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. टीम इंडियासोबत धनव ऑकलंडला रवाना झाला नाही. धवननंतर आता भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

इशांतला रणजी करंडकातील सामना खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंच्या दुखापतींपासून वाचवण्यासाठी बीसीसीआयने एक आयडिया केली आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या काही खेळाडूंना आता रणजी करंडक स्पर्धेत न खेळण्याच्या सुचना दिल्या आहेत.

टॅग्स :पृथ्वी शॉशिखर धवनन्यूझीलंड