Join us

Breaking News : पृथ्वी शॉ याची झाली भारतीय संघात निवड; न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होणार रवाना

पृथ्वी गुरुवारी किंवा शुक्रवारी न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी निघणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 18:54 IST

Open in App
ठळक मुद्देपृथ्वी हा फिट झाल्यानंतर त्याला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

मुंबई : मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा खांद्याच्या दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. पृथ्वी हा फिट झाल्यानंतर त्याला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पृथ्वी गुरुवारी किंवा शुक्रवारी न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी निघणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

काही दिवसांपूर्वी मुंबई आणि रेल्वे यांच्यामध्ये झालेल्या रणजी सामन्यात पृथ्वीला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना पृथ्वी चेंडू अडवायला गेला होता आणि त्याच्या खांद्याला जबर मार बसला होता. या दुखापतीमुळे पृथ्वीला मैदान सोडावे लागले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

या दुखापतीनंतर पृथ्वीच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. पृथ्वी हा आता फिट झाला असून न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात त्याची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉन्यूझीलंड