India vs England : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेचा पाचवा सामना कोरोना व्हायरसमुळे रद्द करावा लागला. चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यापाठोपाठ सपोर्ट स्टाफमधील एकेक सदस्य विलगिकरणात गेला. पाचव्या कसोटीपूर्वीही सपोर्ट स्टाफमधील सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ती कसोटी रद्द करण्यात आली होती. भारतीय संघानं या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे, परंतु पाचवा सामना रद्द झाल्यानं मालिकेचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आला नव्हता. आता पाचवी कसोटी होईल आणि त्यानंतरच निकाल ठरेल. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) रद्द झालेल्या त्या कसोटी सामन्याची नवीन तारीख शुक्रवारी जाहीर केली.
ECBनं दिलेल्या माहितीनुसार रद्द झालेली पाचवी कसोटी आता १ ते ५ जुलै २०२२मध्ये एडबस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव
जय शाह यांनी सांगितले की, भारत-इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. चार कसोटीत आम्ही २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि पाचव्या सामन्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.''
India Tour of England Revised Dates and venues
पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
![]()