Join us  

Breking News : भारतामध्येच होणार 2023चा विश्वचषक, आयसीसीकडून मार्ग मोकळा

भारतामध्ये 2021 साली चॅम्पियन्स करंडर स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 7:30 PM

Open in App

मुंबई : भारतामध्ये आगामी विश्वचषक होणार की नाही, याबाबत काही दिवसांपर्यंत संभ्रम होता. पण 2023 साली होणारा ट्वेन्टी-20 विश्वचषक हा भारतामध्येच होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे. त्यामुळे आता यापुढे भारतामध्ये 2021 साली चॅम्पियन्स करंडर स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे.

भारताने 161 कोटी रुपये भरले तरच त्यांना विश्वचषकाचे यजमानपद देण्यात येईल, असे आयसीसीने यापूर्वी सांगितले होते. भारतामध्ये विश्वचषक झाल्यास त्यांना कर माफी द्यावी लागेल, असे आयसीसीने म्हटले होते. पण आता आयसीसीने आपली कठोर भूमिका बदलली आहे. 

 

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रीचर्ड्सन यांनी सांगितले की, " यापूर्वी भारतामध्ये आम्हाला स्पर्धेसाठी कर माफी देण्यात आली नव्हती. आम्ही जे पैसे कमावतो त्याचा वापर खेळासाठीच करतो. त्यामुळे भारताने आम्हाला कर माफी द्यायला हवी. आतापर्यंत हा निर्णय झाला नसला तरी तो भविष्यात नक्कीच होईल, अशी आम्हाला आशा आहे."

भारताकडून अजून कोणतेही आश्वासन आयसीसीला देण्यात आलेले नाही, पण वेस्ट इंडिजमधील स्पर्धेत आयसीसीला नुकसान सोसावे लागले होते. हे सारे नुकसान भारतातील एका स्पर्धेतून भरून निघू शकते, हे आयसीसीला माहिती आहे. त्यामुळे 2023 साली होणारा विश्वचषक भारतामध्येच खेळवण्याचे आयसीसीने आज जाहीर केले आहे.

2016 मध्ये झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये राज्य किंवा केंदीय सरकारकडून कोणतीही कर सवलत न दिल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे त्यांच्या बीसीसीआयला अल्टिमेटम पाठवले आहे. बीसीसीआयने याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा आदेश धुडकावून लावल्यास त्यांच्या महसूल वाट्यात कपात करण्यात येईल, असा इशाराही आयसीसीने दिला होता.

काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये आयसीसीची एक सभा झाली होती. या सभेमध्ये जर बीसीसीआयने आयसीसीला 161 कोटी रुपये दिले नाहीत तर त्यांना विश्वचषकाचे यजमानपद गमवावे लागेल, असे म्हटले गेले होते. त्यावेळी बीसीसीआयला आपली भूमिका योग्यपद्धतीने मांडता आली नसल्याचे म्हटले गेले. पण आता आयसीसीने आपली भूमिका मवाळ केली आहे. त्यामुळे आयसीसी बीसीसीआयपुढे झुकल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :आयसीसीबीसीसीआय