Join us

Breaking: वर्ल्ड कप गाजवणाऱ्या पाकिस्तानच्या 'या' गोलंदाजाची निवृत्ती

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. पण, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने ही स्पर्धा गाजवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:41 IST

Open in App

लाहोर : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. पण, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने ही स्पर्धा गाजवली. त्यानं 8 सामन्यांत 17 विकेट्स घेत आपला दबदबा दाखवून दिला. पण, संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्याच मोहम्मद आमीरनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 27 वर्षीय आमीर म्हणाला,''पाकिस्तानच्या कसोटी संघाचा सदस्य होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. पण, क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.''  4 जुलै 2009 मध्ये आमीरने श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते आणि 11 जानेवारी 2019मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानं 36 कसोटी सामन्यांत 119 विकेट्स घेतल्या आहेत. 

विराट कोहली अन् पाकिस्तानचा आमीर एकाच संघातून खेळणारबांगलादेश येथे पुढील वर्षी आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे दोन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. 18 व 21 मार्च 2020 या दिवशी मिरपूर येथील शेरे बांग्ला स्टेडियमवर हे सामने होतील. या सामन्याच्या निमित्तानं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर एकाच संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. आशियाई इलेव्हन संघाचे प्रतिनिधित्व हे खेळाडू करतील.

बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.  शेख मुजीबुर रहमान हे बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती होते आणि दुरसे प्रधानमंत्री होते. ऑगस्ट 1975 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हुसैन पापोन यांनी या सामन्यांसाठी जगातील दिग्गज खेळाडू असतील, असे वचन दिले आहे. 

टॅग्स :पाकिस्तानवर्ल्ड कप 2019