Join us  

Breaking : IPL 2020चे वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सलामीला भिडणार

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे 13 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर न झाल्यानं क्रिकेटचाहते नाखुश होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 4:34 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे 13 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर न झाल्यानं क्रिकेटचाहते नाखुश होते. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 11 सदस्यांना कोरोना लागण झाल्यामुळे स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानं चाहत्यांच्या चिंतेत भर पडली. पण, प्रतिक्षेनंतर अखेर बीसीसीआयनं रविवारी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना अबु धाबी येथे खेळवण्यात येणार आहे.

53 दिवसांच्या या स्पर्धेतील सायंकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील, तर डबल हेडरचे 10 सामने दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरू होतील.दुबईत 24, अबुधाबीत 20 आणि शाहजाह येथे 12 सामने होतील.

का झाला विलंब?19 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा उशीरा होण्यामागं चेन्नई सुपर किंग्स कारण ठरले. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं बीसीसीआयनं आयपीएलचे वेळापत्रक होल्डवर टाकले. परिस्थिती न सुधारल्यास चेन्नईला सलामीचा सामना खेळण्याची संधी द्यायची की नाही यावर चर्चा सुरू होती. पण, शुक्रवारी चेन्नईच्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयसमोरील चिंता दूर झाली. 

जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात...

  • चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड,  इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
  • कोलकाता नाइट रायडर्स- दिनेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, हॅरी गर्नी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, क्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, केन रिचर्डसन, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे.
  • दिल्ली कॅपिटल्स - श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.
  • सनरायझर्स हैदराबाद - अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, डेव्हीड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद  खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श,  फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद
  • राजस्थान रॉयल्स - अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अँड्रे टे.
  • किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस गेल, मोहम्मग शमी, के गोवथम, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, निकोलस पूरण, करूण नायर, अर्षदीप सिंग, सर्फराज खान, हार्डस विलजोन, मनदीप सिंग, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, दीपक हुडा, जेम्स निशॅम, रवी बिश्नोई, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तरजींदर ढिल्लोन, प्रभसिमरन सिंग.
टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स