Join us

पुजाराला गोलंदाजी करणे डोकेदुखी : कमिन्स

तो सर्वांत वेगळा तर आहेच त्याचसोबत आमच्यासाठी डोकेदुखीही होता.’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:35 IST

Open in App

मेलबोर्न : कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराला गोलंदाजी करणे सर्वांत कठीण असून, भारताचा हा मधल्या फळीतील फलंदाज आमच्या संघासाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा जागतिक क्रमवारीतील अव्वल गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले आहे.पुजाराने २०१८-१९ मध्ये भारताच्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती होती. कमिन्सला आॅस्ट्रेलियन क्रिकेटर्स संघटनेतर्फे (एसीए) आयोजित प्रश्न-उत्तराच्या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आले की कुठल्या फलंदाजाला गोलंदाजी करणे सर्वांत कठीण आहे. त्यावेळी त्याने पुजाराचा उल्लेख केला. तो म्हणाला, ‘असे अनेक फलंदाज आहेत, पण मी पुजाराचे नाव घेईल. तो सर्वांत वेगळा तर आहेच त्याचसोबत आमच्यासाठी डोकेदुखीही होता.’पुजाराने आॅस्ट्रेलियाच्या यापूर्वीच्या दौऱ्यात तीन शतक व एका अर्धशतकासह ५२१ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने प्रथमच आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. (वृत्तसंस्था)> आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना पुजाराला बाद करताना कुठल्या अडचणी आल्या,याबाबत बोलताना कमिन्स म्हणाला,‘पुजारा दिवसागणिक कमालीची एकाग्रता दाखवत होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला बाद करणे सर्वांत कठीण आहे.’ पुजाराची या मालिकेत ‘मालिकावीर’ पुरस्कारासाठी निवड झाली होती.