Join us

सचिन तेंडुलकरला बाद करून चर्चेत आलेला गोलंदाज जेव्हा रेव्ह पार्टीमध्ये सापडतो तेव्हा...

त्याच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्याचेही आरोप केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 14:31 IST

Open in App

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला बाद करण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाजाचे असते. एका युवा गोलंदाजाने सचिनला बाद करून आपले स्वप्न साकार केले होते. पण हे स्वप्न साकार केल्यावर हा गोलंदाज एका रेव्ह पार्टीमध्ये सापडला होता. यावेळी त्याच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्याचेही आरोप केले होते.

आयपीएलमध्ये खेळत असताना हा गोलंदाज एका रेव्ह पार्टीला गेला होता. या पार्टीमध्ये अंमली पदार्थाचे सेवन केले जात होते. या पार्टीमध्ये हा गोलंदाजही होता. ही पार्टी सुरु असताना पोलीसांनी धाड टाकली आणि त्यामध्ये हा क्रिकेटपटूही होता. त्यामुळे या खेळाडूवर अंमली पदार्थ सेवन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

सचिन तेंडुलकरला या गोलंदाजाने २०१० साली आयपीएलमध्ये बाद केले होते. त्यानंतर या युवा खेळाडूच्या कारकिर्दीच्या कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दोन वर्षे या गोलंदाजाने आपले नाव राखले. पण २०१२ साली झालेल्या एका पार्टीमध्ये हा खेळाडू सापला आणि त्याची कारकिर्द उतरणीला लागली. आता हा खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा गोलंदाज आहे राहुल शर्मा. राहुलचा जम्न ३० नोव्हेंबर १९८६ साली झाला होता.

टॅग्स :सचिन तेंडुलकरआयपीएल