मैदानात पंचांशी भिडला गोलंदाज, पाहा धक्कादायक व्हिडीओ

पंचांनी त्यांचे बोलणे ऐकून घेतले नाही. त्यावेळी गोलंदाज थेट पंचांशी भिडायला गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 16:01 IST2019-01-23T16:00:45+5:302019-01-23T16:01:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Bowler fight with the umpires, see shocking video | मैदानात पंचांशी भिडला गोलंदाज, पाहा धक्कादायक व्हिडीओ

मैदानात पंचांशी भिडला गोलंदाज, पाहा धक्कादायक व्हिडीओ

नवी दिल्ली : पंचांचा निर्णय अंतिम राहील, असे आपण नेहमीच ऐकले आहे. पण या गोष्टीचा विपरीत प्रकार एका सामन्यात पाहायला मिळाला. पंचांनी दिलेला निर्णय न पटल्यामुळे गोलंदाज चक्क पंचांशीच भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. 

एका सामन्यात गोलंदाजाने चेंडू टाकला. चेंडू वाईड जाणार होता. पण फलंदाज आपली बॅट त्या चेंडूला लावायला गेला आणि त्याच्या बॅटची कडा चेंडूला लागला. पण पंचांनी यावेळी हा वाईड बॉल असल्याचा निर्णय दिला. गोलंदाज, यष्टीरक्षक आणि अन्य खेळाडूंनी बॅटला चेंडू लागल्याचे सांगितले, पण पंचांनी त्यांचे बोलणे ऐकून घेतले नाही. त्यावेळी गोलंदाज थेट पंचांशी भिडायला गेला होता.

हा सारा प्रकार घडला तो बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये. ढाका डायनामिक्स आणि कोमिला व्हिक्टोरियन्स या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. यावेळी व्हिक्टोरियन्स संघातील फिरकीपटू मेहंदी हसन हा पंचांवर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. 

हा पाहा व्हिडीओ



 

Web Title: Bowler fight with the umpires, see shocking video