भारताचे उभय संघ इंग्लंडमध्ये दाखल; न्यूझीलंडविरुद्ध रंगणार डब्ल्यूटीसी फायनल

आगमनानंतर दोन्ही संघ साऊथम्पटनकडे रवाना झाले. येथे अनिवार्य क्वारंटाइन पूर्ण केले जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:09 IST2021-06-04T06:09:18+5:302021-06-04T06:09:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Both Indian teams arrive in England | भारताचे उभय संघ इंग्लंडमध्ये दाखल; न्यूझीलंडविरुद्ध रंगणार डब्ल्यूटीसी फायनल

भारताचे उभय संघ इंग्लंडमध्ये दाखल; न्यूझीलंडविरुद्ध रंगणार डब्ल्यूटीसी फायनल

लंडन : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे गुरुवारी येथे आगमन झाले. सोबत महिला संघदेखील येथे आला असून इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध तीन वन डे, तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.

आघाडीचा फलंदाज लोकेश राहुल याने हिथ्रो विमानतळावर सुरक्षित लॅंडिंग झाल्याचा उल्लेख करीत चार्टर्ड विमानाचा फोटो शेअर केला. आगमनानंतर दोन्ही संघ साऊथम्पटनकडे रवाना झाले. येथे अनिवार्य क्वारंटाइन पूर्ण केले जाईल. कोरोना चाचण्यांनंतर महिला संघ १६ जूनपासून ब्रिस्टल येथे कसोटी सामना खेळणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला १८ जूनपासून याच मैदानावर डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळायचा आहे.

इंग्लंडविरुद्ध मालिकेला ४ ऑगस्टपासून नॉटिंघम मैदानावर प्रारंभ होणार आहे. दीर्घकालीन दौरा असल्याने पुरुष खेळाडूंचा २० जणांचा संघ येथे आला आहे. महिला संघाच्या दौऱ्याचा शेवट १५ जुलै रोजी होईल.

Web Title: Both Indian teams arrive in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.