अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा रविवारी

अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 13:44 IST2019-05-04T13:43:36+5:302019-05-04T13:44:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Blind Women's Cricket Competition on Sunday | अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा रविवारी

अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा रविवारी

मुंबई : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) यांच्या सौजन्याने “अनाम प्रेम” संस्थेतर्फे अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार रामलीला मैदान, गौशाला मार्ग, डायमंड मार्केट जवळ, प्रीमल नगर, मालाड पूर्व मुंबई येथे होणार आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) तर्फे खांदेश, मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अश्या सहा विभागातून महाराष्ट्रात अंध क्रिकेटचा विकास करत आहे. यात मुंबईचे दोन संघ सहभागी होणार आहेत. 

राज्यातील अंध क्रिकेट संबंधित कार्यक्रमाना प्रोत्साहन देण्यासाठी सीएबीएम ही महाराष्ट्रातील एकमेव मान्यताप्राप्त संस्था आहे. क्रिकेट ऑफ असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (सीएबीआय) च्या अंतर्गत वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (डब्ल्यूबीसी) शी संलग्न आहे.  संस्थेद्वारे खेळाडूना लागणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम सातत्याने केले जाते. आतापर्यंत ८ आंतरराष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्रने दिले आहेत.

Web Title: Blind Women's Cricket Competition on Sunday

टॅग्स :Womenमहिला