Join us

फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार; ८०० चे तिकीट आठ हजारांत!

सर्वांत स्वस्त तिकीट ८०० चे आहे. त्यासाठी आता आठ हजार, तर १५०० च्या तिकिटासाठी १५ हजार मोजावे लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 05:31 IST

Open in App

अहमदाबाद :  आयपीएल १५ चा अंतिम सामना उद्या, रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. रात्री आठ वाजल्यापासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्याची ऑनलाईन तिकिटे काही तासांतच संपली. ज्यांना तिकिटे उपलब्ध होऊ शकली नाहीत, ते ब्लॅकमध्ये तिकीट घेण्याची तयारी दाखवीत आहेत. यासाठी नऊपट अधिक रक्कम मोजण्याचीदेखील अनेकांची तयारी दिसते.  

सर्वांत स्वस्त तिकीट ८०० चे आहे. त्यासाठी आता आठ हजार, तर १५०० च्या तिकिटासाठी १५ हजार मोजावे लागतील.  एक लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम खच्चून भरण्याची अपेक्षा बाळगली जात आहे. फायनलआधी ५० मिनिटांचा मनोरंजन सोहळा होणार आहे. त्यासाठी ए. आर. रहमान, नेहा कक्कड आणि रणवीरसिंग सारखे ३०० कलावंत उपस्थिती दर्शवतील. 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्स
Open in App