ICC WTC final: ट्रेंट बोल्ट, टिम साऊदीसह सहा खेळाडूंकडून बायोबबलचा भंग;बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

दोन्ही संघांनी मंगळवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. क्रिकबजनुसार, न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी बायोबबल नियमांचा भंग करीत गोल्फसाठी जाणे पसंत केले. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:37 AM2021-06-17T05:37:36+5:302021-06-17T05:38:17+5:30

whatsapp join usJoin us
Biobubble breach by six players, including Trent Bolt, Tim Southee | ICC WTC final: ट्रेंट बोल्ट, टिम साऊदीसह सहा खेळाडूंकडून बायोबबलचा भंग;बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

ICC WTC final: ट्रेंट बोल्ट, टिम साऊदीसह सहा खेळाडूंकडून बायोबबलचा भंग;बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साऊथम्पटन : ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि संघाच्या फिजिओसह न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंनी भारताविरुद्ध अंतिम लढतीआधी बायोबबलचा भंग केला. या प्रकरणी बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार करणार आहे.

हे सर्वजण सकाळी गोल्फ खेळण्यासाठी बाहेर गेले होते. दोन्ही संघांनी मंगळवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. क्रिकबजनुसार, न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी बायोबबल नियमांचा भंग करीत गोल्फसाठी जाणे पसंत केले. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. दोन्ही संघांतील खेळाडू एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास 
आहेत.

फायनल जिंकून निवृत्ती घेणार : वॉटलिंग
भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल जिंकून निवृत्त होण्याची इच्छा न्यूझीलंडचा यष्टिरक्षक-फलंदाज बी. जे. वॉटलिंग याने व्यक्त केली आहे. वॉटलिंगची ही ७५वी कसोटी असेल. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसलेल्या वॉटलिंगने भारताविरुद्ध संघात पुनरागमन केले. भारताविरुद्धच्या सामन्याची प्रतीक्षा असून शानदार कामगिरीस उत्सुक आहे. सामना जिंकूनच निवृत्त होईन, असे त्याने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले. वॉटलिंगने २००९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

गोल्फ खेळायला 
बाहेर पडले

n सकाळी ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, डेरिल मिशेल आणि फिजिओ टॉमी सिमसेक हे गोल्फ खेळण्यासाठी बाहेर पडले. न्यूझीलंडने मात्र आपल्या खेळाडूंनी प्रोटोकॉलचा भंग केला नाही, असा दावा केला. हॉटेल आणि गोल्फ कोर्स एकाच परिसरात असल्याचे त्यांचे मत आहे.
n बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इन्साइड स्पोर्ट्‌स’ला दिलेल्या माहितीनुसार आमच्या व्यवस्थापनाने आयसीसीला ही माहिती दिली. न्यूझीलंडने १५ व्यतिरिक्त असलेल्या आपल्या खेळाडूंना हॉटेलमध्ये कायम ठेवले आहे.
n भारताच्या १५ सदस्यीय संघात ज्यांचा समावेश नाही, असे खेळाडू लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अर्जान नागवासवाला या सर्वांना लंडनमध्ये वास्तव्यास पाठविले आहे.

Web Title: Biobubble breach by six players, including Trent Bolt, Tim Southee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.