Vaibhav Suryavanshi's 13-year-old friend Ayan Raj : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३५ चेंडूत शतक झळकावत आपली खास छाप सोडली. आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या वैभव सूर्यंवशीचा क्रिकेट जगतात बोलबाला सुरु असताना आता बिहारचा आणखी एक लाल पिक्चरमध्ये आलाय. वैभव सूर्यंवशीच्या १३ वर्षांच्या मित्रानं शालेय जिल्हा स्तरीय स्पर्धेत त्रिशतक झळकावत लक्षवेधून घेतले आहे. कोण आहे त्याचा मित्र अन् कोणत्या स्पर्धेत तो चमकलाय जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे वैभव सूर्यंवशीचा मित्र, ज्यानं त्रिशतकी खेळीसह वेधून घेतलंय लक्ष
वैभव सूर्यंवशी याच्यानंतर क्रिकेट वर्तुळात चर्चेत आलेल्या १३ वर्षीय क्रिकेटरचं नाव आहे अयान राज. मुजफ्फरपूर येथे रंगलेल्या ३० षटकांच्या जिल्हा क्रिकेट लीग स्पर्धेत या पोरानं ४१ चौकार आणि २२ षटकारांसह १३४ चेंडूत नाबाद ३३७ धावांची खेळी केली आहे. अयान हा बिहारमधील संस्कृती क्रिकेट अकादमीकडून खेळताना त्याने हा त्रिशतकी धमाका करत सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय!
स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, अयान राज आणि वैभव सूर्यंवशी शालेय क्रिकेटमध्ये एकत्र खेळायचे. या दोघांच्यात चांगली मैत्रीही आहे. त्रिशतकी खेळीनंतर त्याने वैभव सूर्यंवशी प्रेरणास्थान असल्याचेही म्हटले आहे. तो म्हणाला आहे की, वैभव दादा हा माझ्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. मी देखील त्याच्या पावलावर पाउल टाकत भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहतोय.
बिहार होतीये क्रिकेटची नवी नर्सरी
वैभव सूर्यंवशीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये बिहारची एक वेगळी छाप पडली. त्यात आता आणखी एका बिहारच्या पोरानं आपल्यातील धमक दाखवल्यामुळे बिहार ही क्रिकेटची नवी नर्सरी होतीये, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. येत्या काळात वैभव आणि त्याचा १३ वर्षांचा हा मित्र एकत्र धुमाकूळ घालताना दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Bihar Becoming A New Nursery Of Cricket Inspired By Vaibhav Suryavanshi His 13 Year Old Childhood Friend Ayan Raj Smashes 327 in 134 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.