Join us  

रोहित शर्माला मोठा धक्का; मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूवर येऊ शकते बंदी

... त्यामुळे त्याच्यावर आता बंदी घालण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 7:07 PM

Open in App

मुंबई : आयपीएलचा मोसम सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. कारण स्पर्धेपूर्वीच त्यांच्या खेळाडूवर वाईट वेळ आली असून त्याच्यावर बंदी येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

यंदाच्या मोसमात मुंबईने काही युवा खेळाडूंना संघात स्थान दिले. मुंबईने या मोसमासाठी गोलंदाजांना जास्त प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. आगामी मोसमासाठी संघात घेण्यात आलेल्या एका गोलंदाजाची शैली अवैध असल्याचे समजले आहे. त्यामुळे त्याच्यावर आता बंदी घालण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

या गोलंदाजाची शैली अवैध असल्याचे समजले असून त्याबाबतचा अहवालही सादर करण्यात आला आहे. हा अहवाल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. पण त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच त्याच्या बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू दिग्विजय देशमुखने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये ९ बळी मिळवले. त्याचबरोबर या २१ वर्षीय युवा खेळाडूने जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले होते. या सामन्यात आठव्या क्रमांकावर खेळताना त्याने ८१ धावांची खेळीही साकारली होती. ही बातमी न्यूज १८ (हिंदी) यांनी आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागबान यांनी याबाबत सांगितले की, " गेल्या सामन्यात दिग्विजयची गोलंदाजी शैली अवैध असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्याचबरोबर या गोष्टीचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. हा अहवाल आम्ही संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना पाठवला आहे. दिग्विजयला आता निलंबित करण्यात आलेले नाही, पण त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे." 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल