Join us  

गौतम गंभीरला मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने गंभीरच्या विरोधात समन्स बजावण्याचे आदेश दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:22 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरकडे दोन मतदारसंघांचे मतदार ओळखपत्र असल्याचा आरोप आप पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी केला होता. यासंदर्भातील तक्रारीवरून न्यायालयाने गंभीरच्या विरोधात समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने हे आदेश आज मागे घेतले.गौतम गंभीरचा आज (सोमवार) वाढदिवस असून न्यायालयाने आदेश मागे घेणे ही वाढदिवसाचीच भेट समजली जात आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी हे आदेश मागे घेतले. मार्लेना यांनी गंभीरच्या विरोधात समन्स बजावण्यासाठी आवश्यक पुरावे असल्याचा दावा सुनावणीदरम्यान केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर समन्स बजावण्याचा मागे घेतला. यापूर्वी, न्यायालयाने याचिका दाखल करण्यापूर्वी आतिशी यांना या प्रकरणात आपले अधिकार क्षेत्र सिद्ध करण्यास सांगितले होते. गंभीरने जाणीवपूर्वक बेकायदेशीररित्या करोलबाग आणि राजिंदरनगर मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी केली आहे, असा आरोप आतिशी यांनी अ‍ॅड. मोहम्मद इर्शाद यांच्या माध्यमातून केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या वादाने तोंड वर काढले होते. त्यानंतर गंभीरने पूर्वी दिल्ली लोकसभा मतदारसंघात आतिशी यांचा पराभव करीत विजय प्राप्त केला.

टॅग्स :गौतम गंभीरनवी दिल्ली