Join us  

Big News : वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय संघ जाहीर; मुंबईच्या मुशीर खानची झाली निवड

पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना २०२०च्या विजेत्या बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफोंटेन येथे होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 7:13 PM

Open in App

India U19 squad for  ICC Men’s U19 World Cup announced -  दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना २०२०च्या विजेत्या बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफोंटेन येथे होणार आहे, तर यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. हाच संघ २९ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या तिरंगी ( भारत-इंग्लंड व दक्षिण आफ्रिका) मालिकेतही खेळणार आहे.  

टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलपर्यंत कशी पोहोचणार? ICC ने समजावलं नवीन फॉरमॅट १६ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील ४१ सामने ५ वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे व नामिबाया, तर ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ यांचा समावेश आहे. भारताचा संघ - अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्रा मयुर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहरान ( कर्णधार), अरावेली अवनिश राव ( यष्टिरक्षक), सॅमी कुमार पांडे ( उप कर्णधार), मुरुगन अभिषेक, इन्नेश महाजन, धनुश गोवडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी; ( तिरंगी मालिकेसाठी ) राखीव खेळाडू, प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन; अन्य राखीव खेळाडू - दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश, किरण चोरमाळे

भारताचे सामने २० जानेवारी - वि. बांगलादेश२५ जानेवारी - वि. आयर्लंड२८ जानेवारी - वि. अमेरिका

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतबीसीसीआय