भारतीय क्रिकेटला मोठे करण्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात सातत्याने सुधारणा करत आहे. महिला प्रीमियर लीगची सुरुवात केली आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठे बदल केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी आज मोठी घोषणा केली. BCCI ने देशांतर्गत स्पर्धांवरही पैशांचा वर्षाव केला आहे. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने बक्षीस रकमेत वाढ केली आहे. देशांतर्गत रणजी करंडक, इराणी, दुलीप करंडक, विजय हजारे करंडक, देवधर करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक, वरिष्ठ महिला वन डे करंडक, वरिष्ठ महिला ट्वेंटी-२० करंडक या स्पर्धांचा समावेश आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार
IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार
भारतीय क्रिकेटला मोठे करण्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात सातत्याने सुधारणा करत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:47 IST