Join us  

मोठा निर्णय! आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणार तृतीयपंथी

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबत खास नियमही बनवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 7:24 PM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेट इतिहासामध्ये आता एक मोठा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या संघाने घेतला आहे. आपल्या क्रिकेट संघामध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला स्थान देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबत खास नियमही बनवला आहे.

आतापर्यंत एकाही आंतरराष्ट्रीय संघात तृतीयपंथी व्यक्तीला स्थान देण्यात आले नव्हते. पण जर राज्य स्तरावर एखादी तृतीयपंथी व्यक्ती चांगली कामगिरी करत असेल, तर त्या व्यक्तीला राष्ट्रीय संघातही स्थान देण्यात यावे, अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाची भूमिका आहे. जर तृतीयपंथी व्यक्तीला राष्ट्रीय क्रिकेट संघातून खेळायचे असेल तर त्यांना टेस्टोस्टेरोन चाचणी द्यावी लागेल, असेही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये या तृतीयपंथी खेळाडूला स्थान देण्यात येणार आहे. एरिका जेम्स असे या तृतीयपंथी खेळाडूचे नाव आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी सांगितले की, " कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही सहन करणार नाही. तृतीयपंथी नेमके कोण आहेत, असे म्हणत त्यांच्याबाबत भेदभाव केला जातो. पण हीच गोष्ट आम्हाला बदलायची आहे. जर गुणवत्ता असेल तर तृतीयपंथी खेळाडूलाही आम्ही संघात स्थान देऊ."

टॅग्स :आॅस्ट्रेलियाट्रान्सजेंडर