Join us

IPL ला मोठा धक्का! प्रेक्षकसंख्या तब्बल ३३ टक्क्यांनी घटली, नेमकं कारण काय?

इंडियन प्रीमिअर लीगची टीव्ही प्रेक्षकसंख्या आणि रेटिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून यात सातत्याने घट नाेंदविण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 08:25 IST

Open in App

नवी दिल्ली :

इंडियन प्रीमिअर लीगची टीव्ही प्रेक्षकसंख्या आणि रेटिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून यात सातत्याने घट नाेंदविण्यात येत आहे.

‘बीएआरसी’च्या (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल) आकडेवारीनुसार, पहिल्या आठवड्यातील प्रारंभीच्या ८ सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग २.५२ एवढे हाेते. त्या तुलनेत २०२१ मध्ये  ३.७५ एवढे रेटिंग हाेते, तर २०२० मध्ये ३.८५ एवढे रेटिंग मिळाले हाेते. टीव्ही रेटिंगशिवाय व्ह्यूअरशिपमध्येही १४ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. यावर्षी आकडेवारीनुसार, पहिल्या ८ सामन्यांमध्ये २२९.०६ दशलक्ष एवढी प्रेक्षकसंख्या मिळाली, तर हाच आकडा गेल्यावर्षी २६७.७ दशलक्ष एवढा हाेता.

या हंगामामध्ये केवळ दाेन सामन्यांना प्रत्येकी १०० दशलक्ष प्रेक्षकसंख्या मिळाली. त्या तुलनेत २०२१ आणि २०१९ या दाेन हंगामामध्ये अनुक्रमे ४ आणि ७ सामन्यांना एवढी प्रेक्षकसंख्या मिळाली हाेती. आयपीएलच्या मागील काही सत्रांचा अनुभव असा की, प्रत्येकवर्षी सामने पाहणाऱ्यांची संख्या वाढतच गेली आहे. आयपीएलच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास काही गडबड  आहे असे वाटत नाही. आठवड्याअखेर बीसीसीआयने ‘डबल हेडर’(एका दिवशी दोन सामने) ठेवले आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App