इंडियन प्रीमीयर लीगच्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे मेंटॉर केविन पीटरसन यांनी संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या येत्या हंगामामध्ये मी दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर असणार नाही, असे केवीन पीटरसन यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून सांगितले. आपल्याकडे कामासाठी आवश्यक वेळ नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा समालोचक आणि ब्रॉडकास्टरच्या रूपात दिसणार आहे.
यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये केविन पीटरसनने सांगितले की, मी यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर बनू शकत नाही. मी या कामासाठी आवश्यक ती वेळ देऊ शकत नाही. या हंगामासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा. मात्र मी तुम्हाला समालोचन करताना नक्की भेटेन. आयपीएल ही जगातील सर्वात उत्तम लीग आहे. तसे मी तुम्हा सर्वांना लवकरात लवकर भेटण्याची वाट पाहत आहे.
केविन पीटरसन मागच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे मेंटॉर बनले होते. तसेच स्पर्धा सुरू असताना कुटुंबीयांसह मालदीवमध्ये फिरण्यासाठी गेल्याने पीटरसन हा चर्चेत आला होता. गतवर्षी ६ एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर केविन पीटरसन मालदिवला रवाना झाला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्याला तो मुकला होता. अचानक सुट्टी घेऊन मालदिवला जाण्याच्या त्याच्या निर्णयावर टीकाही झाली होती.
Web Summary : Delhi Capitals faces setback as mentor Kevin Pietersen withdraws from the upcoming IPL season due to time constraints. He will return as a commentator. He was previously criticized for taking a mid-season vacation.
Web Summary : दिल्ली कैपिटल्स को झटका, मेंटर केविन पीटरसन ने समय की कमी के कारण आगामी आईपीएल सीजन से नाम वापस ले लिया। वह कमेंटेटर के तौर पर वापसी करेंगे। पहले वह मध्य सत्र में छुट्टी लेने के लिए आलोचित हुए थे।