Nathan Ellis Ruled Out IPL 2026 : आयपीएलच्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन एलिस याने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे. चेन्नईच्या संघाने अद्याप बदली खेळाडूच्या रुपात कोणत्याही खेळाडूची घोषणा केलेली नाही. स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, नॅथन एलिस स्थायू दुखापतीमुळे त्रस्त असून यंदाच्या हंगामाला मुकणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डेथ ओव्हर स्पेशलिस्ट
नॅथन एलिस हा डेथ ओव्हर स्पेशलिस्टच्या रुपात चेन्नईच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज होता. त्याच्या जागी कुणाला संघात घ्यायचं यासंदर्भात CSK नं शोध सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियन स्टार स्पर्धेबाहेर झाल्यामुळे न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला अधिक संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"एकही प्याला नको रे बाबा!" चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियन खेळाडूंमुळे ३ IPL फ्रँचायझी संघांना धक्का
ऑस्ट्रेलियन नॅथन एलिस याने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८६ टी २० सामन्यात २३१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये ३६ सामन्यात त्याने ५५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ही आकडेवारी तो यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असे वाटत होते. पण आता दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे. याआधी ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्सच्या रुपात सनरायझर्स हैदराबादला आणि जोश हेजलवूडच्या रुपात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दणका बसला होता. हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्याला मुकणार आहेत.
CSK च्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज
चेन्नई सुपर किंग्सचा ताफ्यात यंदाच्या हंगामात मॅट हेन्रीसह गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, खलील अहमद हे जलगती गोलंदाज उपलब्ध आहेत. याशिवाय अष्टपैलून मध्यम जलदगती गोलंदाजाच्या रुपात मौजूद हैं. इसके शिवम दुबे, जाक फाउल्केस, अंशुल कंबोज, जेमी ओव्हर्ट ह पर्याय उपलब्ध आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघ :
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, डेवॉल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हर्टन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, संजू सॅमसन, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, राहुल चाहर, अकील हुसेन, मॅट हेनरी, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, जॅकरी फॉल्केस.
Web Summary : Chennai Super Kings faces a blow as Nathan Ellis withdraws from IPL 2024 due to a persistent injury. CSK is searching for a replacement for the death overs specialist. This follows similar setbacks for SRH and RCB with Cummins and Hazlewood's availability. Matt Henry might get more opportunities.
Web Summary : चेन्नई सुपर किंग्स को बड़ा झटका लगा है क्योंकि नाथन एलिस चोट के कारण IPL 2024 से हट गए हैं। CSK डेथ ओवरों के विशेषज्ञ के लिए एक विकल्प की तलाश कर रहा है। इससे पहले कमिंस और हेज़लवुड की उपलब्धता के साथ SRH और RCB को भी ऐसा ही झटका लगा था। मैट हेनरी को अधिक मौके मिल सकते हैं।