Virat Kohli, IPL 2023 : विराट कोहलीच्या RCB ला ३.२ कोटींचा फटका, मिळालाय मोठा झटका! पाहा नेमकं काय घडलं

Indian Premier League 2023 - भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 02:40 PM2023-03-06T14:40:41+5:302023-03-06T14:41:48+5:30

whatsapp join usJoin us
Big BLOW Royal to Challengers Bangalore as Rs 3.2 crore signing Will Jacks suffers INJURY scare ahead of Indian Premier League 2023 | Virat Kohli, IPL 2023 : विराट कोहलीच्या RCB ला ३.२ कोटींचा फटका, मिळालाय मोठा झटका! पाहा नेमकं काय घडलं

Virat Kohli, IPL 2023 : विराट कोहलीच्या RCB ला ३.२ कोटींचा फटका, मिळालाय मोठा झटका! पाहा नेमकं काय घडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2023 - भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ ला सुरूवात होत आहे आणि यंदाच्या वर्षी होणारी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन BCCI आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंच्या वर्क लोडवर लक्ष ठेऊन असणार आहे. आयपीएल २०२३ ला सुरुवात होण्यापूर्वी काही संघांना धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( Royal Challengers Bangalore) लिलावात ३.२ कोटी मोजून संघात घेतलेला स्टार अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स ( Will Jacks Injury) याला दुखापत झाली आहे.

इंग्लंडचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि यादरम्यान विल जॅक्सला दुखापत झाली व त्याने मालिकेतून माघार घेतली. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड यांच्यानंतर विराट कोहलीच्या RCB साठी हा तिसरा मोठा धक्का आहे. ही दोघं IPL 2023 ची काही सामने मुकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात जॅकला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. ECBच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जॅक ४८ तासांच्या आतच रिहॅबिलिएशनसाठी मायदेशात रवाना झाला. जॅकचे आयपीएलमध्ये खेळणे संशयाच्या भवऱ्यात आहे. 

ग्लेन मॅक्सवेलला पर्याय म्हणून RCBने लिलावात जॅकला ३.२ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. जॅक इंग्लंडच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाचा सदस्य आहे आणि तो सातत्याने क्रिकेट खेळतोय. मागील सप्टेंबर महिन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०तून पदार्पण केले. त्यानंतर रावळपिंडी कसोटीत पदार्पणात त्याने ६ विकेट्स घेतल्या. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळळला आणि तेथून न्यूझीलंड दौऱ्यावर संघासोबत गेला. त्यानंतर तो वन डे मालिकेसाठी ढाका येथे आला.   

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फ‌ॅफ ड्यू प्लेसिस, आकाश दीप, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, फिन अ‌ॅलन, करन शर्मा, एस प्रभुदेसाई, अनुज रावत, सिद कौल, शाहबाज अहमद, रजत पाटिदार, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, जोश हेझलवूड, रिसे टॉप्ली, हिमांशू शर्मा, विल जॅक्स, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंद, सोनू यादव.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Big BLOW Royal to Challengers Bangalore as Rs 3.2 crore signing Will Jacks suffers INJURY scare ahead of Indian Premier League 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.